सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 165 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 165 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

संस्था वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी संस्था वर्धापन दिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. आज संस्थेला 165 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने अगदी छोटासा पण छान कार्यक्रम प्रशालेत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 1984 सालातील बॅचचे माजी विद्यार्थी श्रीयुत नितीन आपटे सर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माननीय मुख्याध्यापक श्री भारमळ सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रीमती मेघना देशपांडे मॅडम यांनी करून दिला. शाळा समिती अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बद्दल सविस्तर माहिती श्रीमती कांता इष्टे मॅडम यांनी सांगितली. त्यानंतर यावर्षीचे आपल्या संस्थेचे प्रेरणा गीत समाज जीवन भारून टाकू चैतन्याने सर्वांनी ऐकले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत नितीन आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांचा शाळेबद्दलचा जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. आजही शाळा तितकीच सुंदर आणि स्वच्छ आहे. विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे जाणारी ही विद्यार्थ्यांची सक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर यांनी सर्वांशी संवाद साधत अजूनही आपल्याला खूप काही शाळेसाठी करायचे आहे. त्यासाठी शाळेने शाळेसाठी व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप उपस्थित मान्यवर व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानून करण्यात आला.

This will close in 0 seconds

Scroll to Top