*पुणे शहरात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव; प्रशालेलाही मानाची ट्रॉफी* क्रीडा भारती अंतर्गत दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात […]
*पुणे शहरात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव; प्रशालेलाही मानाची ट्रॉफी*
क्रीडा भारती अंतर्गत दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा ज्ञान परीक्षेत म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. क्रीडाविषयक ज्ञान, खेळांविषयीची जागरूकता आणि विद्यार्थ्यांमधील क्रीडासंस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली.
या परीक्षेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरात सर्वाधिक गुण मिळवून *१२ विद्यार्थ्यांनी ५० पैकी ५० गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.* विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे प्रशालेचा गौरव वाढला असून, विद्यार्थ्यांच्या सामूहिक सहभागाबद्दल प्रशालेला सन्मानचिन्ह ट्रॉफी प्रदान करण्यात आली. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे यश
क्रीडा ज्ञान परीक्षेत पुणे शहरस्तरीय निकालामध्ये संस्कृती निम्हण अकरावी हिने द्वितीय क्रमांक पटकावून दोन हजार रुपये रोख पारितोषिक व ट्रॉफी मिळवली. अकरावीतील संतोष कदम याने तृतीय क्रमांक मिळवून ५०० रुपये रोख पारितोषिक व ट्रॉफी प्राप्त केली. मुलींच्या गटातील यशस्वी विद्यार्थिनी
– *प्रथम क्रमांक :* अनुष्का नुनावत – इयत्ता बारावी – *द्वितीय क्रमांक :* मेघना शिंदे – इयत्ता बारावी – *तृतीय क्रमांक :* प्रज्ञा गोरे – इयत्ता बारावी * मुलांच्या गटातील यशस्वी विद्यार्थी
– *प्रथम क्रमांक :* सार्थक माळी – इयत्ता आठवी – *द्वितीय क्रमांक :* रुद्र पोखरकर – इयत्ता अकरावी – *तृतीय क्रमांक :* श्रावणी केदारी – इयत्ता दहावी 50 पैकी 50 गुण मिळालेले एकूण बारा विद्यार्थी संस्कृती निम्हण, संतोष कदम, अनुष्का नसावत,शिंदे मेघना, गोरे प्रज्ञा, सार्थक माळी, पोखरकर रुद्र, केदारी श्रावणी, आदित्य पवार, आयुष वाशिवले,सिंग प्रशांत, आयुषी वाशिवले.
वरील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल
कौतुक करण्यात आले.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या
समारंभाला अखिल भारतीय क्रीडा ज्ञान परीक्षा प्रमुख, क्रीडा भारती; अखिल भारतीय कार्यालय प्रमुख श्री.विजय रजपूत; क्रीडा भारती क्रीडा ज्ञान परीक्षा प्रमुख श्री.दीपक मेहेंदळे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख; क्रीडा भारती कार्यकारिणी सदस्य तथा अखिलभारतीय बॉलबॅडमिंटन संघटनेचे सचिव धोंडीराज गोसावी सर; तसेच क्रीडा भारती पुणे महानगर सहमंत्री भाऊराव खुणे उपस्थित होते.