*पुणे शहरात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव; प्रशालेलाही मानाची ट्रॉफी* क्रीडा भारती अंतर्गत दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात […]
अंडर-१७ मुली व मुलांच्या निमंत्रित हँडबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचा नावलौकिक उंचावला!
दुआ केंद्र फाउंडेशन यांच्या वतीने शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी कर्वेनगर येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्कूलमध्ये अंडर-१७ मुली व मुलांच्या निमंत्रित हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सांघिक खेळाच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामुळे प्रशालेचा नावलौकिक उंचावला असून सर्वत्र विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.