प्रशालेत प्रजासत्ताक दिनाचा समारंभ

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत प्रजासत्ताक दिनाचा समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व राष्ट्रीय अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. भारती कुंभार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संदेश दिला. प्रमुख पाहुणे श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांनी *मराठी शाळेतील शिक्षणाचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. तसेच कर्कश हॉर्न न वाजवण्याचे आवाहन करत पालकांनी मुलांना वेळ देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाला समिती अध्यक्ष श्री. अजय पुरोहित सर यांनी* “भारत माझा देश आहे” या भावनेचा विसर पडू नये व आपण विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत आहोत, याची जाणीव ठेवावी, असे प्रेरणादायी विचार मांडले. सन 2007 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री. राहुल बोराटे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ विशेष योगदान देत विद्यार्थ्यांना *शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी साधन कवायत, तर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी लेझीम पथकाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.

https://youtu.be/I8gXbZBF8aQ

This will close in 0 seconds

Scroll to Top