महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत *दिनांक 17 जानेवारी २०२६, वार शनिवार* रोजी प्रशालेच्या मैदानावर *वार्षिक स्नेहसंमेलन* मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात पार पडले.
या वर्षीच्या स्नेहसंमेलनाचा विषय “भारतीय सण आणि उत्सव” असा होता. या विषयानुसार विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमात *सांघिक नृत्य, सोलो नृत्य, नाट्यप्रयोग तसेच ‘मूल्य जपणे’ या विषयावर आधारित नाटक* सादर करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणातून भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांचे महत्व, परंपरा आणि सामाजिक मूल्ये प्रभावीपणे मांडण्यात आली.
स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या *कलागुणांना वाव देणारे उत्तम व्यासपीठ* असल्याचे या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपली कला सादर केली.
या कार्यक्रमाला प्रशालेचे *महामात्र डॉ. निर्भय पिंपळे सर,*मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सुनीता गायकवाड मॅडम,पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक , माजी विद्यार्थी तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























आनंदाची बातमी