महाराष्ट् एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला येथे दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गणित प्रयोगशाळेच्या उद्घघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी एअर मार्शल (निवृत्त) भूषणजी गोखले उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती ताटके दिपा व श्रीमती मृदुला पायगुडे उपस्थित होत्या.
यावेळी महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.श्री. अतुल कुलकर्णी, प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे, महाराष्ट् एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य श्री राहुल मिरासदार, महाराष्ट् एज्युकेशन सोसायटी चे कार्यकारी अधिकारी श्री सचिन आंबर्डेकर मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका सौ. सुनीता गायकवाड, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर यांनी केले. त्यांनी गणित प्रयोगशाळेचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून गणित शिकण्याची ही उत्तम संधी असल्याचे सांगितले.
यानंतर सौ. मेघना देशपांडे मॅडम यांनी मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती न बाळगता प्रयोगशाळेच्या माध्यमातून गणित अधिक सोपे व रंजक बनवावे, असा मौल्यवान सल्ला दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती ठेवून अभ्यासात प्रगती करावी तसेच गणित प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका श्रीमती. लता टिळेकर यांनी केले व उपस्थित त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी आवड निर्माण होऊन प्रयोगातून शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली.








