महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेतील पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत महिला सहकाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी माजी विद्यार्थिनी निवृत्त अधिकारी श्रीमती भूषणा करंदीकर, उद्योजिका श्रीमती ऋचा वाटवे, कथ्थक नृत्यांगना श्रीमती आभा वांबूरकर आणि व्हायोलिन वादक श्रीमती चारुशीला देव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्रीमती करंदीकर यांनी आपल्या मनोगतात शाळेतील शिक्षण आणि संस्कारांमुळे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले, असे सांगितले.
मुख्याध्यापक श्री रोहिदास भारमळ यांच्या प्रास्ताविकात महिला सहकाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे यांनी महिलांचा सन्मान, समान संधी आणि प्रोत्साहन हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री रोहिदास भारमळ यांच्यासह शिक्षक श्री प्रवीण भोईटे, श्री सुनील जोशी, श्री सोमनाथ भोये, श्री गणेश हिले, श्री योगेशचंद्र देवळालकर, श्री अनंत कुलकर्णी, श्री राजेंद्र पावरा, श्री प्रभय्या हंद्राळमठ, श्री धनराज प्रजापती आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री अतुल सरडे, श्री लौकिक वांजळे, श्री भीम कोंढाळकर, श्री पंडित महाले, श्री सागर फाजगे, श्री गणेश फडकले यांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.





