New Events
म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 औंध क्लस्टर विभागात प्रथम क्रमांक पटकावला
💐💐आनंदाची बातमी!💐💐
महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटीची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ठरली औंध क्लस्टर विभागात अव्वल
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 मध्ये सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने औंध क्लस्टर विभागात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शालेय तपासणीत विविध क्षेत्रांमध्ये शाळेने उत्कृष्ट कामगिरी केली. भौतिक सुविधा, प्रशासन, शैक्षणिक अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, शालेय विभाग व्यवस्थापन, गुणवत्ता संवर्धन आणि विशेष उपक्रम या सर्व मापदंडांमध्ये शाळेने उच्च गुण प्राप्त केले.
शाळेच्या या यशस्वी कामगिरीमागे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि पालक या सर्व घटकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ म्हणाले, "हे यश सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. आमच्या शाळेतील प्रत्येक घटकाने केलेल्या अथक परिश्रमांचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू."
शालासमिती अध्यक्ष मा.श्री. अजय पुरोहित व महामात्र श्री.निर्भय पिंपळे यांनी शाळेच्या कार्याबद्दल दिलेल्या संदेशात म्हणाले, "सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या या यशासाठी मी शाळेतील सर्व घटकांचे, विशेषतः शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचे आभार मानतो. हे यश आम्ही मिळवले ते सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी आणि अथक परिश्रमांनी. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता केवळ शाळेतील कार्यक्षमतेवर आधारित नाही, तर यामध्ये माजी विद्यार्थ्यांचे,पालकांचे, विद्यार्थ्यांचे आणि शाळेतील प्रत्येक व्यक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भविष्यकाळात देखील शाळेचा प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी कटिबद्ध राहील."
म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण व उद्योजकता मुलाखत समारंभ संपन्न....
दि. 21 डिसेंबर रोजी सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व उद्योजकता मुलाखत समारंभ संपन्न झाला. वर्षभरातील विविध परीक्षा, विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा, बाह्य परीक्षा, तसेच शालांत परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिली जातात. यामध्ये पद्मभूषण डॉ.आबासाहेब गरवारे स्मृती पारितोषिक पाचवी ते सातवी मधील शेडगे शाल्वी अविनाश आठवी ते दहावी मधील पौळ आकाश कैलास विद्यार्थ्यांना देण्यात आले.
शिक्षकांमध्ये श्री.जगन्नाथ भास्कर देवस्थळे व सौ सिंधू जगन्नाथ देवस्थळे पारितोषिक सौ .शुभदा अभ्यंकर मॅडम, सौ. विद्या गायकवाड मॅडम, सौ. पूनम गिरमे मॅडम तसेच, श्रीमती .ज्योती इनामदार तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये श्री .विजय नाईक यांना देण्यात आले. कै.पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रशालेत दरवर्षो प्रमाणे उद्योजक मुलाखत घेण्यात आली. यावर्षी प्रशालेच्या 2000 सालच्या माजी विद्यार्थीनी व यशस्वी उद्योजिका ऋचा वाटवे यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थीनी ते एक यशस्वी उद्योजिका हा प्रवास अलगद उलगडला. विद्यार्थ्यांना यातून उच्चशिक्षण घेण्याची तसेच उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळाली.
सकाळ स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो मध्ये ब्राँझ मेडल
सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो प्रकारात प्रशालेला ब्राँझ मेडल मिळाले.
शाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
आज शाळेत क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्री.रवींद्र गोडबोले सर व श्री.अरुण अन्नछत्रे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या महोत्सवाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विविध खेळ प्रकारांत त्यांच्या कौशल्याला वाव देणे असल्याचे मा. मुख्याध्यापक श्री.भारमळ सर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख पाहुणे श्री.अरुण अन्नछत्रे सर यांनी खेळाच्या महत्त्वावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना खेळाकडे गंभीरपणे पाहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, शिक्षक, स्नेहसंमेलनाचे शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी आणि सर्व शालेय पदाधिकारी उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवात लंगडी, डॉजबॉल, क्रिकेट,रस्सीखेच, थ्रोबॉल,वैयक्तिक 100 मीटर धावणे यासारख्या विविध खेळ प्रकारांचा समावेश असून पुढील ४ दिवस चालणाऱ्या या क्रीडामहोत्सवात खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी असेल.
शिक्षक - शैक्षणिक सहल