प्रयोगातून विज्ञान शिका – उन्हाळी सुट्टी निमित्त मुलांसाठी विशेष उपक्रम.

आज मंगळवार दिनांक 15 4 2025 रोजी सौ विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी निमित्त विज्ञान भारती पुणे व टेक फोरम यांच्या माध्यमातून विद्यार्थी प्रिय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिला कार्यक्रम विज्ञान शिका आज दुपारी 12 ते 3 वेळेमध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमांमध्ये विज्ञान भारतीचे श्री भगवान चक्रदेव त्यांचे सहकारी यांनी अतिशय मनोरंजक वैज्ञानिक दृष्टी देणारे प्रयोग त्याचे सादरीकरण केले. मुलांना सतत खेळून ठेवणारे हे प्रयोग प्रणाली प्रिन्सिपल, चुंबकत्व, गुरुत्वियमध्य इत्यादी संकल्पना स्पष्ट झाल्या. अर्थातच विज्ञान भारतीचे श्री विलास रबडे, म. ए. सो. चे माजी सरचिटणीस विनायक शुक्ल सर, विज्ञान भारतीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

 

This will close in 0 seconds

Scroll to Top