महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. […]
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आज प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा आणि राष्ट्रीय अभिमानाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शालेय पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि माजी विद्यार्थी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या NCC पथकाने सलामी आणि मानवंदना देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पंच श्री. सुदीप बर्वे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य श्री. राहुल मिरासदार उपस्थित होते.
श्री. सुदीप बर्वे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत म्हटले, “शाळेने घडवलेले माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करत आहेत. आज तुमच्यासाठी विविध क्षेत्र करियर साठी खुली आहेत.तुम्ही शाळेच्या वारसाचे पालन करून, गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठा.”
श्री. राहुल मिरासदार यांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक चांगल्या गोष्टीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.”चांगले नागरिक होण्यासाठी फक्त शिक्षणच नाही, तर समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे.”असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ शिक्षिका सौ. रागिनी भालेराव आणि ज्येष्ठ सेवक श्री. विजय नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सौ. रागिनी भालेराव यांनी संविधानाच्या मूल्यांचा आदर करत समतेच्या दृष्टीकोनातून समाज निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
NCC पथकाने उत्कृष्ट संचलन तर घोष पथकाने उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या संचलन आणि प्रात्यक्षिकातून राष्ट्रीय एकतेचा, विविधतेतील एकतेचा आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला. हा समारंभ विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करणारा ठरला.
आनंदाची बातमी
Demo Description
आनंदाची बातमी
पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.