सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत “विना गॅस पाककृती” या स्पर्धेचे आयोजन.

          शनिवार दि.३१-७-२०२१ रोजी सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत उपक्रमाच्या तासाला इयत्ता ६ वी व इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ विना गॅस पाककृती ‘ या स्पर्धेचे आयोजन केले गेले.पालकांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थ्यांनी आपापल्या पाककृती सादर केल्या.विद्यार्थ्याना स्पर्धेसाठी विषय देण्यात आले होते. झूम ॲपवर ही स्पर्धा घेण्यात आली.
अतिशय उत्साहाने विद्यार्थी यात सहभागी झाले.याप्रसंगी पालकांचे विशेष आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील शिक्षिका सौ.शिल्पा गायकवाड,सौ स्वप्नाली देशपांडे व सौ.तेजल खाडे यांनी केले.
या उपक्रमासाठी प्रशालेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.नाईक मॅडम व प्रशालेचे पर्यवेक्षक मा.श्री.यादव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

This will close in 0 seconds

Scroll to Top