सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत ‘मएसाे चा वर्धापन दिन संपन्न

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या साै. विमलाबाई गरवारे प्रशालेत आज 19 नोव्हेंबर 2021 रोजी म.ए.साे चा 161 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मएसाे चे संस्थापक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांना विनम्र अभिवादन करण्यातआले.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक यांनाी आपल्या मनोगतातून दर्जेदार शिक्षण घेऊन चांगला नागरिक निर्माण करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते असे सांगितले .व सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत संस्थेमध्ये काम करण्याची सर्वांना संधी मिळाल्याबद्दल संस्थेप्रति कृतज्ञता व्यक्त केली .

प्रशालेच्या शिक्षिका केशर जाधव यांनी संस्थेविषयी व संस्थापकांविषयी माहिती , सांगत संस्थेचा आणि सातासमुद्रापार पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.

संस्थेच्या सर्व शाखांचा विस्तार तसेच ऐतिहासिक वास्तू असलेल्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील मराठी माध्यमाच्या शाळेचे एकमेव वेब रेडिओ केंद्र सुबोधवाणी एक वर्ष पूर्ण होण्याकडे वाटचाल करत आहे .
अशा गौरवशाली संस्थेच्या विकासाचा आढावा संस्थेची उज्ज्वल परंपरा जपण्याची व ती पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रशालेच्या मुख्याध्यापिका साै. अनिता नाईक मॅडम उपमुख्याध्यापक श्री. संजय जाधव सर पर्यवेक्षिका रेखा देशपांडे मॅडम सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या शिक्षिका नलिनी पवार यांनी केले.

प्रशालेच्या शिक्षिका स्वप्नाली देशपांडे यांच्या आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .

 

आनंदाची बातमी 

पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हा स्तरावर मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाला. हे यश सर्व आजी, माजी विद्यार्थी, पालक , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व पदाधिकारी यांचे आहे.

This will close in 20 seconds

This will close in 0 seconds

Scroll to Top