Web Master

म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 औंध क्लस्टर विभागात प्रथम क्रमांक पटकावला

💐💐आनंदाची बातमी!💐💐 महाराष्ट्र एजयुकेशन सोसायटीची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ठरली औंध क्लस्टर विभागात अव्वल पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 मध्ये सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने औंध क्लस्टर विभागात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. दिनांक 13 जानेवारी 2025 …

म.ए.सो.ची सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 औंध क्लस्टर विभागात प्रथम क्रमांक पटकावला Read More »

निर्मिती भारताची या प्रदर्शनाला भेट

विषय: भूगोल प्रदर्शन – निर्मिती भारताची स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर    दिनांक: १० जानेवारी २०२५ सहभागी वर्ग: इयत्ता ६ वी- शिवनेरी, रायगड आणि इयत्ता ७ वी- शिवनेरी. विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांना भारताच्या भौगोलिक वैविध्याची जाणीव व्हावी या उद्देशाने या शैक्षणिक प्रदर्शन पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये भारताचे विविध भौगोलिक विभाग दाखवण्यात आले …

निर्मिती भारताची या प्रदर्शनाला भेट Read More »

सकाळ स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो मध्ये ब्राँझ मेडल

    सकाळ तर्फे घेण्यात आलेल्या  स्कूलिंपिक्स आंतरशालेय स्पर्धेत गरवारे प्रशालेला खो-खो  प्रकारात प्रशालेला  ब्राँझ मेडल मिळाले.

तृणधान्य जनजागरण प्रदर्शन

सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी तृणधान्य जनजागरण प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्याच प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री. निखिल जोशी (1997 च्या बॅचचे ) आणि जेडब्ल्यू कन्सल्टन्सी चे संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाला समितीचे महामात्र श्री. सुधीर गाडे, शिक्षण प्रबोधिनीचे उपसंचालक श्री.केदार तापीकर तसेच बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम उपस्थित …

तृणधान्य जनजागरण प्रदर्शन Read More »

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा

  दिनांक 19 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य माननीय भालेराव सर , सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाळा समितीचे नूतन अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर, प्रशालेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कणाकणाने व गुणागुणाने …

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा Read More »

मएसो, सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत अनामिक क्रांतिकारकांची ओळख पथनाट्य सादर

आपल्या देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त “अनामिक क्रांतिकारकांची ओळख” या विषयावर म.ए.सो.च्या सौ.विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागातील (इ.१२वी) मुलींनी स्वा.वि.दा.सावरकर भवन व गुडलक चौक,डेक्कन जिमखाना येथे पथनाट्य सादरीकरण केले. या पथनाट्यातून समाजाचे प्रबोधन व्हावे हा उद्देश होता.

मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.

सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत ६ सप्टेंबर,२०२२ मंगळवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व गुरूस्तवनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम यांनी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची महानता सांगत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवाशक्ती निर्माण करण्याचा संकल्प करूया असा संदेश दिला . श्री.जगन्नाथ भास्कर देवस्थळे व सिंधुताई जगन्नाथ …

मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा. Read More »

म. ए. सो . सौ. विमलाबाई गरवारे पालखी सोहळा

म. ए. सो . सौ. विमलाबाई गरवारे पालखी सोहळा . प्रशालेचे मस्त,गोड छोटे वारकरी पालखी घेऊन गरवारे मेट्रो स्टेशनवर आणि तिथे हा भव्य दिव्य पालखी सोहळा रंगला . फूगडी काय . गोल फेर काय या सोबत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडूरंगा विठ्ठलाचा गजर ,ग्यानबा तुकाराम ,माऊली माऊली या गजराने अख्ख मेट्रो स्टेशन दणादूण गेले. सर्व मेट्रो …

म. ए. सो . सौ. विमलाबाई गरवारे पालखी सोहळा Read More »