मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.

सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत ६ सप्टेंबर,२०२२ मंगळवार रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व गुरूस्तवनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम यांनी भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची महानता सांगत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवाशक्ती निर्माण करण्याचा संकल्प करूया असा संदेश दिला . श्री.जगन्नाथ भास्कर देवस्थळे व सिंधुताई जगन्नाथ देवस्थळे, यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार मूर्तींची नावे पुढीलप्रमाणे-

पर्यवेक्षिका – साै.रेखा देशपांडे
ज्युनिअर कॉलेजचे- श्री .प्रवीण भोईटे
सकाळ विभाग – साै. स्वप्नाली देशपांडे
वरिष्ठ लिपिक -श्री.अतुल सरडे
यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थी मनोगत व्यक्त करताना, पर्यवेक्षिका सौ. रेखा देशपांडे मॅडम यांनी “भारतरत्न “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन करत, आधुनिक काळातील स्पर्धेला सामोरे जाणारा सशक्त व तेजस्वी विद्यार्थी घडवूया असे मत व्यक्त केले. व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली.पाहुण्यांचे मनोगत
श्री .अभिजीत देवस्थळे हे श्री. अरुण देवस्थळे यांचे सुपुत्र व श्री .जगन्नाथ भास्कर देवस्थळे यांचे नातू. त्यांनी आपल्या मनोगतातून माझे आजोबा हे हाडाचे शिक्षक होते. त्यांनी पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार दिले. जातात याचा आम्हांला अभिमान वाटतो. तसेच शिक्षणतज्ञ कै. प्र. ल .गावडे सर व श्री. अरुण देवस्थळे, या गुरु शिष्यांच्या स्मृतीला उजाळा देत हा वारसाचा असाच चालू राहील अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे शाला समिती अध्यक्ष  श्री .विजय भालेराव सर यानी,शिक्षकांनी आपल्या कार्याप्रती जाणिवा प्रगल्भ करून जबाबदारीने आपली कर्तव्य करावे. नवीन शिक्षण पद्धतीमध्ये टेक्नॉलॉजी व मानवी संसाधन यांचा सुरेख संगम करत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे व विद्यार्थी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावे असे मत व्यक्त केले. व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला श्री. अभिजीत देवस्थळे शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री .संजय जाधव सर ,पर्यवेक्षिका सौ रेखा देशपांडे मॅडम , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. दीपक खेमलापुरे, पालक सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Comment