मएसो  सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

मएसो  सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

                   कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भारमळ सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी जीवनातील योगाचे महत्त्व सांगितले . प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री . गणेश हिले सर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मयूर भावे सर उपस्थित होते. त्यांच्या सोबत त्यांच्या टीमनेही सहभाग घेतला.
श्री. मयूर भावे सर गेली १५ वर्षे स्वतः योगासने करत आहेत व मागील १० वर्षांपासून योग प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी सिमेन्स कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पूर्णवेळ योग आणि पर्यावरण क्षेत्रात कार्य करायचे ठरवले आहे. त्यांनी योग विद्या गुरुकुल, नाशिक येथून योग शिक्षक, योग प्रवीण, योग अध्यापक, योगा थेरेपिस्ट, YCB II हे अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. सध्या ते ऑनलाइन आणि प्रत्यक्ष दोन्ही प्रकारे वर्ग घेतात. कार्यक्रमात भावे सरांनी सूर्यनमस्कार, उभी व बैठी आसने, ताडासन ,वृक्षासन , शशांकासनआणि योगधारणेची प्रात्यक्षिके करून दाखवली.
कार्यक्रमाला प्रशालेचे महामात्र डॉ .निर्भय पिंपळे सर,मुख्याध्यापक श्री .रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ . खिरीड मॅडम, सन 1987 सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री .मयूर भावे सर व त्यांची टीम उपस्थित होते .

This will close in 0 seconds

Scroll to Top