उपक्रम 5 वी ते 10 वी
*पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा*
*पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा*
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या *सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत* "आनंदी शनिवार" या उपक्रमांतर्गत व चित्रकला विभागाच्या वतीने दिनांक 23 ऑगस्ट वार शनिवार रोजी पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती रंगविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीतील एकूण *१७८ विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.* विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून गणपतीच्या मूर्ती रंगविण्याची संधी देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व कौशल्याने अतिशय *मन मोहक गणेशमूर्ती* रंगविल्या. रंगकाम करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, कला कौशल्याची जपणूक
अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये *पर्यावरण पूरक सण साजरा करण्याची प्रेरणा* निर्माण होते तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने "पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे" या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून सौ. दर्शन ठकार व श्री. दिलीप ठकार यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात करून दिले. मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला.
इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण 32 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती घडविताना सण साजरा करतानाही पर्यावरणाचे जतन कसे करता येते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
https://www.youtube.com/watch?v=ct8qiCiQtEE
हर घर तिरंगा अभियान
दहीहंडी व गोपालकाला सोहळा
सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत दिनांक -१४ ऑगस्ट वार गुरुवार रोजी गोपालकाला व दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी राधा-कृष्ण यांच्या वेशभूषेत हजेरी लावली. रंगीबेरंगी पोशाख, फुलांची माळा, मोरपंखी मुकुट, बासरी या सर्व गोष्टींनी परिसर कृष्णमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सौ.मुक्ता कौलगुड मॅडम यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित कथा , इतिहास सांगून केली. त्यानंतर मैदानावर गोपालकाला खेळ सादर करण्यात आला. दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या खांद्यावर चढून मानवी मनोरा रचला आणि हंडी फोडून सगळ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
या सोहळ्यात मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक *मारुती चितमपल्ली* यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुस्तकांची "पुस्तक हंडी" साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने भाग घेतला. मैदानावर जल्लोषमय वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. सुनीता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मैदानावर मोठ्या उत्साहात व आनंदात दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला.
म. ए. सो. सौ . विमलाबाई गरवारे प्रशाले मध्ये वृक्ष बांधवांना व पुस्तकांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
म. ए. सो. सौ . विमलाबाई गरवारे प्रशाले मध्ये वृक्ष बांधवांना व पुस्तकांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गा विषयी प्रेम निर्माण व्हावे तसेच वृक्षांविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी आणि शाळेतला गाभा म्हणजेच पुस्तक या पुस्तकांची ओढ निर्माण व्हावी यासाठी पुस्तकांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन प्रशालेत साजरे करण्यात आले यासाठी माननीय पदाधिकारी माननीय मुख्याध्यापक श्री. भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. गायकवाड सुनिता मॅडम व पर्यवेक्षिका सौ शिंदे जयश्री मॅडम यांनी मार्गदर्शन केले. राख्या बनवण्यासाठी कला शिक्षिका सौ. सराफ मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
मएसो सौ. विमालबाई गरवारे प्रशालेत भक्तिपूर्ण वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन
मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत विद्यार्थ्यांना आयुका सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी गॅलेक्सी या विषयावर व्याख्यान
शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी इयत्ता नववी शिवनेरीच्या निवडक 10 विद्यार्थ्यांना आयुका सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या ठिकाणी गॅलेक्सी या विषयावर व्याख्यान देण्यात आले तसेच शिक्षकांसाठी आयुका या संस्थेचा विस्तार व कार्य याविषयीची माहिती देण्यात आली. या क्षेत्रभेटीची काही क्षणचित्रे.












































