उपक्रम Jr. College
इयत्ता अकरावीच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षातील इयत्ता अकरावीसाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजतासौ. विमलाबाई गरवारे हॉल येथे अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता १२ वीमधील विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर म.ए. सो. गीत सादर केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च. माध्य. विद्यालयाच्या विभागप्रमुख सौ. भारती पाटील यांनी केले. शिक्षकवृंदाचा परिचय सौ. सुप्रिया खाडिलकर यांनी करून दिला. उच्च माध्यमिक विद्यालयाचे नियम आणि महत्त्वाच्या सूचना सेवाज्येष्ठ शिक्षक श्री. योगेशचंद्र देवळालकर यांनी दिल्या.
विद्यालयामार्फत एक अत्यावश्यक आणि महत्वाची सेवा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते ती म्हणजे समुपदेशन केंद्र . या केंद्राच्या समुपदेशिका सौ. सुजाता शिंदे यांनी समुपदेशन केंद्राची ओळख नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी केंद्राची गरजही स्पष्ट केली. यानंतर इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयाबाबतीत जिव्हाळा प्रकट करणारी आपली मनोगते व्यक्त केली.
दि. रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी, पुणे आयोजित नुकत्याच पार पडलेल्या अमृतप्रभा समूहगीत गायनस्पर्धेत कनिष्ठ महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला .या संघाचे कौतुक मा. मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमाळ आणि माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.
मा.मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात इयत्ता अकरावीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी सौ. विमलाबाई गरवारे माध्य. आणि उच्च माध्य. विद्यालयाच्या मा. उपमुख्याध्यापिका सौ. सुनिता गायकवाड आणि मा. पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे यांची उपस्थिती सानंदनिय होती.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत... पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धा
हर घर तिरंगा अभियानांतर्गत...
पर्यावरणपूरक रांगोळी स्पर्धा ( इयत्ता बारावी ) 13/8/2025
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे...
प्रथम क्रमांक :
1) कु. अंजली दिवटे -12 A
2) कु. समिधा बंदरकर -12A
द्वितीय क्रमांक :
1) कु. ऋतुजा ढेबे-12 B
2) कु. मानसी कोकाटे -12 B
तृतीय क्रमांक
1) कु. वैभवी जाधव- 12 C
उत्तेजनार्थ
1) संस्कार सुतार -12A
2) मयूर सुतार -12 B
सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन!! 🌺🌺यबर सुरक्षिततेबाबतची जागरूकता वृद्धिंगत झाली.
🌸 राखी बांधणी व सामाजिक बांधिलकी कार्यक्रम 🌸
🌸 राखी बांधणी व सामाजिक बांधिलकी कार्यक्रम 🌸
दिनांक 8 ऑगस्ट 2025, शुक्रवार रोजी
सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकी जोपासत डेक्कन पोलीस स्टेशन येथे भेट दिली. विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचे संरक्षण व सेवा याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच प्रशालेत झाडांना व पुस्तकाला राखी बांधून पर्यावरण व ज्ञानसंवर्धनाची शपथ घेतली.
या वेळी *पीएसआय संदीप कदम यांनी विद्यार्थिनींना “मोबाईल व सायबर क्राईम पासून सावध रहा” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ सर, तसेच कॉलेजचे शिक्षक अपर्णा भणगे मॅडम, अमृता मांडके मॅडम व योगेशचंद्र देवळालकर सर उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये देशसेवा, पर्यावरणप्रेम आणि सायबर सुरक्षिततेबाबतची जागरूकता वृद्धिंगत झाली.
आनंदवार्ता
आनंदवार्ता
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी पुणे आयोजित अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा 2025
मंगळवार दिनांक 5/8/25 रोजी अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा संपन्न झाली.
ध्वजगीत हा समूहगीताचा विषय असून कनिष्ठ महाविद्यालय या गटात म. ए. सो.सौ विमलाबाई गरवारे प्रशाला जुनियर कॉलेज मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी संगीत शिक्षक श्रीराम पोतदार आणि रूपाली देशपांडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेतर्फे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे ज्युनिअर कॉलेज मध्ये इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांकडून गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन
गुरुंचे महत्त्व , त्यांच्याबद्दलचा आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून साजरा केला जातो. आषाढ शुद्ध पौर्णिमा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणूनही साजरी केली जाते.
दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मएसो सौ.विमलाबाई गरवारे माध्य. आणि उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या मा. उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित होत्या. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन कु. गौरी दुधाणे या विद्यार्थिनीने केले. आपल्या प्रास्ताविकात तिने मानवी जीवनातील गुरूंचे अत्युच्च स्थानाचे महत्त्व प्रतिपादन केले. प्रास्ताविकानंतर इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन सादर केले. यावेळी गुरुंबद्दलची कृतार्थता आपल्या मनोगतातून गायत्री गायकवाड या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
चि. अभिनव मुंडे या विद्यार्थ्याने गुरुंप्रति आदरभाव व्यक्त करणारी एक कविता सादर केली. अतिशय बहारदार आणि हृद्य वातावरणात मा. उपमुख्याध्यापिका आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती जयश्री मोहिते यांचा तसेच श्री. गणेश फडकले यांचा सन्मान गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन विध्यार्थ्यानी केला.
कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवाज्येष्ठ शिक्षक श्री. योगेशचंद्र देवळालकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करून सुरक्षा रक्षक श्री. वैद्य काका यांचाही सत्कार केला. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे श्री. देवळालकर यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले.
या सर्व कार्यक्रमाचे प्रेरणास्थान असलेले प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांच्याप्रती विद्यार्थ्यांनी ऋण व्यक्त केले.

म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे ज्युनिअर कॉलेज मध्ये योग दिन साजरा
योग दिन
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे ज्युनिअर कॉलेज, पुणे
दिनांक 21 जून 2025 रोजी दुपारी योग दिनाचा कार्यक्रम कॉलेजमध्ये उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सौ. रुपाली देशपांडे यांनी केलेल्या योग प्रार्थनेने झाली. प्रार्थनेनंतर सौ. अपर्णा भणगे यांनी योग दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन जीवनातील स्थान समजावून सांगितले.
प्राचार्य श्री. भारमाळ सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर श्री. तनपुरे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध 10 प्रकारची योग प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योगासनात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंदांनी मोलाची साथ दिली.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करून योगाचा महत्वाचा संदेश पोहोचवण्यात हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.































