उपक्रम Jr. College
नदीकाठच्या परिसराची स्वच्छता
गुरुवार 2/01/2025 रोजी सकाळी 8.00 वाजता म. ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता अकरावीचे विद्यार्थी यांनी पर्यावरण विषयातील सामाजिक उपक्रम म्हणून पांचाळेश्वर घाटावरील नदीकाठच्या परिसराची स्वच्छता केली.
नदीकाठावर असलेले प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या, कापडाचे तुकडे, पुठ्ठे असा चार पोती कचरा जमा केला.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे संस्कार रुजावे, मी कचरा करणार नाही ही जाणीव निर्माण व्हावी व भविष्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण ही माझी जबाबदारी आहे याचे भान विद्यार्थ्यांना यावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
वीर बाल दिवस साजरा
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारेउच्च माध्यमिक विभाग, पुणे 04
दिनांक: 2 जानेवारी 2025
सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विभागात 2 जानेवारी 2025 रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. या विशेष दिनाच्या निमित्ताने शाळेने शूरवीर बालकांच्या त्याग आणि शौर्याला सलाम केला. कार्यक्रमामध्ये उच्च माध्यमिक विभाग प्रमुख सौ. भारती पाटील मॅम व सर्व शिक्षकवर्ग, तसेच 11वी व 12वी विज्ञान आणि वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वरूप:
कार्यक्रमाची सुरुवात सौ. भणगे मॅम यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर कथाकथन व प्रेझेंटेशन सत्र झाले.
1. सौ. जोशी मॅम यांनी गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या धैर्याची कथा सांगितली.
2. सौ. देशपांडे मॅम यांनी चार साहिब जादे या वीरबालकांच्या कथा सादर केल्या.
3. सौ. अभ्यंकर मॅम यांनी सादर केलेल्या चित्रमय स्लाइड्स व ऐतिहासिक तपशीलांनी सत्र अधिक रोचक झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. देवळालकर सरांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले
प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सादर केलेले कथाकथनामुळे विद्यार्थ्यांना शौर्य, त्याग, व देशभक्तीची प्रेरणा मिळाली. वीर बाल दिवस हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी शालेय जीवनात एक महत्त्वपूर्ण ठरला.
वार्षिक सहल
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विभागाची वार्षिक सहल लेण्याद्री -शिवनेरी किल्ला -ओझर येथे दिनांक 7 डिसेंबर 2024 शनिवार रोजी नेण्यात आली. या सहलीसाठी सायंन्स व कॉमर्स चे एकूण 235 विद्यार्थी आणि 12 शिक्षक, 1 शिपाई सहभागी होते.
लेण्याद्री येथील "गिरीजात्मक" व ओझर येथील " श्री. विघ्नहर "गणपती ही अष्टविनायकां पैकी महत्वाची ठिकाणे आहेत. अतिशय सुंदर उंच अशा लेण्याद्री येथे आपल्याला बौद्ध लेण्यांचा उत्कृष्ट नमुना पाहण्यास मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या " शिवनेरी " किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. किल्ल्याच्या आतमध्ये शिवाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा,हत्ती दरवाजा , शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा,कुलाबकर दरवाजा असे सात दरवाजे लागतात.
किल्ल्यावर गेल्यावर तेथे किल्ल्याच्या मध्यभागी बदामी तलाव आहे. त्याशिवाय शिवकुंज, अंबरखाना, कडेलोट टोक , पाण्याच्या टाक्या , आणि किल्ल्याचे इतर अवशेष पाहायला मिळतात.
श्री. देवळालकर सर यांनी विद्यार्थ्यांना किल्ल्याची माहिती दिली. सौ. रुपाली देशपांडे मॅडम यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला ज्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सकाळी बस ने निघाल्यावर विद्यार्थ्यांना नाष्टा व चहा व संध्याकाळी चविष्ट जेवण व आईस्क्रीम देण्यात आले.
क्रीडा महोत्सव
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विभागामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात पार पडला.
दि. 11/12/2024 बुधवार रोजी क्रीडा महोत्सवाचे दिमाखात उदघाटन झाले.
कॉमर्स व सायंन्स च्या 11 वी व 12 वी च्या सर्व मुले आणि मुली यासाठी दि. 12/12/2024 गुरुवारी मुलांसाठी व्हॉलीबॉल तर मुलींसाठी थ्रो बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच दि. 13/12/2024 शुक्रवारी मुले आणि मुलींसाठी क्रिकेट चे आयोजन करण्यात आले.
सायंन्स व कॉमर्स च्या प्रत्येक वर्गातील मुले आणि मुली अशा टीम करून या स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रशालेचे मा. प्राचार्य श्री. भारमळ सर हे देखील उपस्थित होते.
उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिपाई, व क्रीडा शिक्षक यांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सर्व विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा क्रिकेट चा आनंद घेतला.
वार्षिक स्नेहसंमेलन
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विभागात वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने यावर्षी "कुटुंबाव्यवस्था " यावर आधारित वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली.दि. 19/12/2024 गुरुवार रोजी झालेल्या स्नेहसंमेलनात कुटुंबावर आधारित सुंदर नृत्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
यामध्ये गणेशवंदना, भक्तीगीते, स्त्री सशक्तिकरण, महाभारत द्रौपदी वस्त्रहरण ड्रामा , मैत्री, यावर सुद्धा छान सादरीकरण झाले.
सर्व सायंन्स व कॉमर्स च्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनात खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपप्राचार्या सौ. ज्योती खिरीड मॅडम यांनी सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी सौ इष्टे मॅडम व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रतिनिधी सौ. भारती पाटील मॅडम आणि उच्च माध्यमिक विभागाची संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी होती. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. भारमळ सर, उपप्राचार्या सौ. खिरीड मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती पवार मॅडम याचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या निमित्ताने दि. 18/12/2024 रोजी
उच्च माध्यमिक विभागात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. पारंपारीक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच दि. 20/12/2024 रोजी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अल्प आहाराचा आस्वाद घेतला.
प्रेरणा वर्ग
म.ए.सो.सौ. विमलाबाई गरवारे उच्च माध्यमिक विभागामध्ये दरवर्षी प्रमाणे इ.12 वी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सायंन्स व कॉमर्स च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी "प्रेरणा " वर्गाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये सायंन्स मधील Biology दि. 29/11/2024
Physics दि. 30/11/2024
Chemistry दि. 2/12/2024
कॉमर्स मधील
BC&AC दि. 2/12/2024
OCM दि. 3/12/2024
Eco दि. 5/12/2024
या कालावधीत विषय तज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
विज्ञान प्रदर्शन सहभाग व यश