ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे आज निधन झाले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रा.प्र.ल गावडे सर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यानिमित्त आज दिनांक २ ऑगस्ट रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत सरांना
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साै. विमलाबाई गरवारे प्रशालेत १९६३ते १९८२ मध्ये प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले . सुसंस्कृत व जबाबदार विद्यार्थी हाच खरा भारताचा आदर्श नागरिक होऊ शकतो यावर विश्वास ठेवत सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत अनेक प्रयोग केले गेले. आणि त्यातूनच आदर्श नागरिकांची पिढी निर्माण झाली. सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला म्हणजेच डॉ. प्र .ल गावडे सरांची शाळा असे समीकरणच झालेले आहे .विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याप्रती आदरभाव होता .  मुख्याध्यापक आणि उत्कृष्ट शिक्षण तज्ञ म्हणून सरांची ख्याती होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पीएचडी करणारे ते प्रथम व्यक्ती होते.
महाराष्ट्रातील या महान शिक्षणतज्ञाला सौ. विमलाबाई गरवारे परिवारातर्फे विनम्र अभिवादन ! !

Leave a Comment