महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा

 

दिनांक 19 नोव्हेंबर 2023 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत संस्था वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला
याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य माननीय भालेराव सर , सौ विमलाबाई गरवारे प्रशालेच्या शाळा समितीचे नूतन अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरोहित सर, प्रशालेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कणाकणाने व गुणागुणाने वाढत जाणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गुणवत्तेच्या दृष्टीने देखील विकसित होण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता व नवीन येऊ घातलेल्या एन ए पी शिक्षण प्रणालीचा अंगीकार आपण केला पाहिजे असे प्रतिपादन माननीय श्रीयुत भालेराव सरांनी व्यक्त केले
तसेच मराठी माध्यमाच्या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू यात असे मत शाला समिती अध्यक्ष श्रीयुत पुरोहित सरांनी व्यक्त केले. प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ अनिता नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व संस्था वर्धापन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशालेच्या शिक्षिका सौ नलिनी पवार यांनी महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचा इतिहास अतिशय सविस्तरपणे उलगडून सांगितला
त्याचप्रमाणे प्रशालेच्या शिक्षिका सौ स्वप्नाली देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत ईशस्तवन व मऎसोगीत सादर केले.

Leave a Comment

This will close in 0 seconds