महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने व आनंदात साजरा झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन 1990 च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री. सचिन पंडित,
जुनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. भारती पाटील मॅडम, प्रशालेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ .सुनीता गायकवाड मॅडम,पर्यवेक्षिका सौ.
जयश्री शिंदे मॅडम पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. पद्मनाभ तांबे, एन.सी.सी ऑफिसर श्री .सुनील जोशी सर प्रशालेचे माजी विद्यार्थी, पालक वर्ग, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 1990 च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री .सचिन पंडित व ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. भारती पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत
तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिक्षकांनी राज्यगीत सादर केले.
हिंदी व संस्कृत भाषेतून समूहगीत गायन
करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आजच्या शुभदिवशी असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस
जाधव तनिष, आनंदकर शरण, कांबळे निकिता या विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांनी पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या .
1990 च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री.सचिन पंडित यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं जे काम हातात घेऊ ते काम श्रेष्ठ समजून केले तर त्यामध्ये नक्कीच यश मिळते असे प्रतिपादन केले.
सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जुनिअर कॉलेजच्या सौ भारती पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की वृक्ष संवर्धन त्याची जोपासना, पर्यावरण संरक्षण हे देखील देश कार्य आहे . त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
भारत मातेच्या जयजयकाराने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ.विद्या गायकवाड यांनी केले.
“उत्सव तीन रंगांचा आकाशी आज सजला.
नतमस्तक मी त्या , साऱ्यांसाठी ज्यांनी भारत देश घडविला”.
जय हिंद! जय भारत!