उपक्रम 5 वी ते 10 वी
ड्रोन उडवण्याचे मूलभूत प्रशिक्षण
इयत्ता नववी रायगड या वर्गासाठी ड्रोन ची माहिती व ड्रोन उडवण्याचे मूलभूत प्रशिक्षण माननीय श्री श्रीकांत गबाले यांनी दिले .त्याची ही काही क्षणचित्रे.
सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत वीरबाल दिन साजरा
मएसोची सौ विमलाबाई गरवारे प्रशालेत दोन जानेवारी 2025 या दिवशी वीरबाल दिन साजरा करण्यात आला. शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह यांच्या चारही मुलांचे बलिदान धर्म रक्षणार्थ झाले. त्यातील सर्वात छोटी दोन मुले केवळ धर्मपरावर्तन करणार नाही असे सांगितल्यामुळे भिंतीत चिणून मारले गेले. केवळ नऊ आणि सात वर्षाच्या या साहेबजाद्यांनी अनेक संकटे सहन करून सुद्धा आपण धर्मपरावर्तन करणार नाही याच मुद्द्यावर ठाम राहून मृत्यू स्वीकारला. ते शहीद झाले हा दिवस 26 डिसेंबर चा होता परंतु शाळेला नाताळची सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम दोन जानेवारी या दिवशी घेण्यात आला. या संदर्भातील कथा शाळेतीलच शिक्षिका सौ पद्मा पटवर्धन यांनी सांगितली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ यशदा देशपांडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ मार्गसिद्धा पवार व उपमुख्याध्यापक सौ. ज्योती खिरीड होत्या या कार्यक्रमासाठी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी उपस्थित होते.
📚📚ग्रंथालय विभाग व ग्रंथालय उपक्रम📚📚 शैक्षणिक वर्षे 2024-25
* सर्व शिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक वाटप इ. 5वी ते 8 वी.
* नवीन शाळेत प्रवेश केलेल्या इ. 5 वी च्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख व्हावी म्हणून ग्रंथालय सफर घडवण्यात येते. विविध विषयांची पुस्तके वर्तमान पेपर नियतकालिके पुस्तके देवाण करावयाचे नियम वाचनाचे महत्त्व हे देखील माहिती त्यावेळी सांगण्यात येते.
* संत सप्ताह निमित्त संतांची सखोल ओळख व्हावी याकरिता संतांचे काव्य,ओव्या, गोष्टी, संतांचे महत्त्व व्यवस्थित समजावे याकरिता यावर्षी ती पुस्तके वाचनासाठी देण्यात आली व ' मी वाचलेला संत ' यावर माहिती लिहून घेऊन ती वर्गवाणीवर सांगण्यात आली.
📌ऑगस्ट 2024
क्रांती सप्ताहा निमित्त विविध क्रांतिकारकांची पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली. तसेच 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्ताने इ. 5 वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांकडून त्यांची पुस्तके वाचन करून घेऊन ' मी वाचलेले पुस्तक' याचे परीक्षण लिहून विद्यार्थ्यांचे पुस्तक परीक्षणाचे व्हिडिओ तयार करण्यात आले.
* दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालयात पुस्तक वाचन कट्टा भरवण्यात आला, यामध्ये इ. 8वी चे विद्यार्थी सहभागी होते.
* देशभक्तांच्या प्रेरणादायी पुस्तकांची दहीहंडी यामध्ये विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये विविध पुस्तकांच्या चिठ्ठ्या टाकून पुस्तक हंडी फुटल्यावर त्या चिठ्ठीत लिहलेल्या नावाचे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात आले.
📌सप्टेंबर 2024
14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त इ. 9 वी च्या विद्यार्थ्यांकडून हिंदी विषयाचे नाट्य वाचन सराव करून घेण्यात आला. व त्याचे सादरीकरण करण्यात आले.
* सप्टेंबर महिन्यात दिलेल्या चट तासाला 9 शिवनेरीच्या वर्गावर पुस्तक पेटी नेऊन वाचन उपक्रम घेण्यात आला.
📌ऑक्टोबर 2024
वाचन प्रेरणा दिनानिमित्त दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशालेतील जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व इ. 5वी ते 7 वी चे काही विद्यार्थी असे 65 विद्यार्थी घेऊन ग्रंथालय भेटीसाठी नेण्यात आले होते.( आबासाहेब अत्रे दिन प्रशाला, रास्ता पेठ )
* 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन हा प्रशाला स्तरावर देखील साजरा करण्यात आला.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण केले. तसेच पुस्तकांचे वाचनही घेण्यात आले. कलाम यांच्या बालपणीच्या गोष्टी देखील विद्यार्थ्यांनी सांगितल्या.ह्याची तयारी ग्रंथलयात करवून घेण्यात आली.
* डॉ. अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या गोष्टी, माहिती एक छान व्हिडिओ तयार करण्यात आला
*नोव्हेंबर 2024
बाळासाहित्यिक डॉ. संगीता बर्वे ह्यांच्या " माझे आजोळ " पुस्तकातील काही कथाचें अभिवाचन करण्यात आले. त्याचा सराव ग्रंथालयात करवून घेण्यात आला. तसेच त्याचे सादरीकरण सेंट मेरी विद्यालयात करण्यात आले.
आगामी ग्रंथालय उपक्रम
1. " आनंदी शनिवार " या उपक्रमांतर्गत त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण हा विद्यार्थी सादरीकरण करण्यात येणार आहे.
2. दरवर्षीप्रमाणे ग्रंथ प्रदर्शन भरवणे.
. 3. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन साजरा करणे.
4. वर्तमानपत्राचे वाचन कसे करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे.
5. वाचन वेगासारखे उपक्रम दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये घेणे.
6. मराठी राजभाषा दिनानिमित्त एक नाटिका बसवणे.
सेंट मेरीज शाळेला विद्यार्थ्यांचीअनोखी भेट.
मिले सुर मेरा तुम्हारा......
दिनांक 14 नोव्हेंबर रोजी
सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेतील 20 विद्यार्थ्यांच्या गटाची शैक्षणिक भेट St. Mary's School, Camp येथे करण्यात आली. हा आगळावेगळा अनुभव घेण्यासाठी सर्व विद्यार्थी फार उत्साहात होते.
St. Mary's School ने आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचे समूहगीताने खूप सुंदर रित्या स्वागत केले. जनरल नॉलेजवर आधारित इंग्रजी भाषेतून प्रश्नमंजुषा घेण्यात आली या अंतर्गत आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्या प्रशालीतील शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मने जिंकली.
मुलांचे संगीत खुर्ची व रुमाल पाणी यांसारखे खेळ घेतले. यावेळी St. Mary's Schoolच्या मैदानावरील दोन्ही प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीक फरक न आढळता निखळ मैत्रीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही खेळांमधील विजेते विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन St. Mary's Schoolच्या मा.मुख्याध्यापिका Caroline Roseयांनी मुलांचे कौतुक केले. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक Piano playच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर केले. अतिशय आत्मविश्वासाने कुटुंब या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले त्याचप्रमाणे मराठी वैयक्तिक गीत गायन तसेच काव्यअभिवाचन केले. बालदिनाचे औचित्य साधून ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले हिंदी भाषेतील पत्रवाचन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात नवीन अनुभव घेण्याची संधी प्रशालेतील विद्यार्थ्यांना आजच्या शैक्षणिक भेटीमुळे मिळाली. St. Mary's Schoolच्या मा.मुख्याध्यापिका Caroline Rose आणि ज्येष्ठ शिक्षिका Rachel Khisty यांनी तसेच इतर शिक्षकांनी देखील आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना अतिशय आपलेपणाने त्यांच्यामध्ये सामावून घेत मार्गदर्शन केले.
या संपूर्ण उपक्रमासाठी मा. Robert Jones sir आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. विलास रबडे सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे आजची शैक्षणिक भेट सुलभरीत्या पार पडण्यासाठी प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री भारमळ सर, उपमुख्याध्यापिका सौ. खिरीड मॅडम व पर्यवेक्षिका सौ.पवार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
आजची शैक्षणिक भेट ही दोन्ही प्रशालेतील वैविध्यपूर्ण संस्कृतीची जोपासना करत त्यातील दूवा साधणारी ठरली.
शाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
आज शाळेत क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी श्री.रवींद्र गोडबोले सर व श्री.अरुण अन्नछत्रे सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या महोत्सवाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विविध खेळ प्रकारांत त्यांच्या कौशल्याला वाव देणे असल्याचे मा. मुख्याध्यापक श्री.भारमळ सर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख पाहुणे श्री.अरुण अन्नछत्रे सर यांनी खेळाच्या महत्त्वावर भर दिला आणि विद्यार्थ्यांना खेळाकडे गंभीरपणे पाहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, शिक्षक, स्नेहसंमेलनाचे शिक्षक व शिक्षकेतर प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी आणि सर्व शालेय पदाधिकारी उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवात लंगडी, डॉजबॉल, क्रिकेट,रस्सीखेच, थ्रोबॉल,वैयक्तिक 100 मीटर धावणे यासारख्या विविध खेळ प्रकारांचा समावेश असून पुढील ४ दिवस चालणाऱ्या या क्रीडामहोत्सवात खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी असेल
बालरंजन केंद्रामध्ये पथनाट्य सादर
गुरुवार दिनांक पाच डिसेंबर 2024 रोजी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या बालरंजन केंद्रामध्ये पथनाट्य सादरीकरणासाठी आपल्याला आमंत्रित केले होते. मुले आणि पालकांना पथनाट्य खूप आवडले छान अभिप्राय मिळाले व शाळेसाठी बक्षीसही देण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात पालखी सोहळा रंगला.
म. ए. सो.गरवारे प्रशालेमध्ये विठू नामाचा गजर.....
शाळेच्या प्रांगणात पालखी सोहळा रंगला.
दिनांक 16 जुलै 2024 मंगळवार रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ .विमलाबाई गरवारे प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने विठ्ठल -रुक्मिणी, संतांच्या व वारकरी वेशभूषा परिधान करून उत्साहाने या दिंडीत सहभाग घेतला. प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री भारमळ सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. श्रीमती खाडे तेजल यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व व वारीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी आनंदाने या दिंडीत टाळ ,चिपळ्यांचा गजर केला ,फेर धरला, रिंगण केले फुगड्या खेळल्या. या दिंडीचा मार्ग प्रशालेतून कर्वे रोड , खंडोजी बाबा चौक ,गुडलक चौक, भांडारकर रोड बाल शिक्षण मंदिर शाळेतून सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला असा होता. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली व प्लास्टिकचा वापर आम्ही पूर्णपणे टाळू असा निश्चय केला.
महाराष्ट्राची हजारो वर्षांची वारीची*परंपरा जपत इयत्ता नववीतील विद्यार्थी जयसिंग वाघ याने आळंदी ते पंढरपूर वारी सायकलवर पूर्ण केली. ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानबा तुकाराम, माऊली माऊली चा गजर करत भगवी पताका,टाळ, मृदुंग व विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेऊन पारंपारिक वेशामध्ये दिंडीमध्ये सहभाग घेतला.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ , उप मुख्याध्यापिका ज्योती खिऱीड , पर्यवेक्षिका मार्गसिद्धा पवार , शिक्षक, विद्यार्थी सर्वांनी सहभाग घेतला.दिंडी सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात पार पडला.
विद्यार्थिनींनी रिक्षावाले काका यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा