सहभागी वर्ग: इयत्ता ६ वी- शिवनेरी, रायगड आणि इयत्ता ७ वी- शिवनेरी. विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांना भारताच्या भौगोलिक वैविध्याची जाणीव व्हावी या उद्देशाने या शैक्षणिक प्रदर्शन पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये भारताचे विविध भौगोलिक विभाग दाखवण्यात आले होते. यामध्ये हिमालय पर्वतरांगा, गंगेचे मैदान, थार वाळवंट, पश्चिम घाट, पूर्व घाट आणि दक्षिणेकडील पठारी प्रदेश यांचे प्रतिकृती नमुने ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील सर्व विभागांना भेट दिली आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. या शैक्षणिक प्रदर्शन भेटीमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांची प्रत्यक्ष ओळख झाली. अशा प्रकारची प्रदर्शन भेट विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.