सर्व पालकांना कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की, आपल्या शाळेने पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त गुणवत्ता संवर्धन अभियान 2024-25 मध्ये उत्कृष्ट यश संपादन केले आहे.
दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या शालेय तपासणीत विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शाळेने उत्तम गुण प्राप्त केले असून, औंध क्लस्टर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय पदाधिकारी,माजी विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय पदाधिकारी, माजी विद्यार्थी आणि पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपण सर्वांनी मिळून केलेल्या परिश्रमांचे हे फलित आहे. यापुढेही असेच सहकार्य लाभो, ही अपेक्षा.
धन्यवाद.
मुख्याध्यापक
श्री. रोहिदास भारमळ
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे.