म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून सौ. दर्शन ठकार व श्री. दिलीप ठकार यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात करून दिले. मातीपासून मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला.

इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण 32 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती घडविताना सण साजरा करतानाही पर्यावरणाचे जतन कसे करता येते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

Scroll to Top