मराठी माध्यमाच्या पुण्याच्या शाळेतील पहिले हवामान केंद्र
(मएसाे) सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत हवामान केंद्र व सायकल दुरुस्ती कार्यशाळेचा चे उदघाटन समारंभ १० मे राेजी उत्साहात पार पडला. हवामान क्षेत्रातील IITM चे संशोधक डॉ. मिलिंद मुजुमदार यांच्या हस्ते हवामान केंद्राचे उदघाटन झाले.
पुणे शहरातील मराठी माध्यमाच्या शाळेतील हे पहिले हवामान केंद्र आहे याचा शाळेला अभिमान असल्याचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता नाईक मॅडम यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका व प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाच्या समन्वयक सौ मेघना देशपांडे मॅडम यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उदघाटक डॉ. मिलिंद मुजूमदार यांनी दैनंदिन जीवनात हवामानाच्या नोंदी घेणे किती महत्वाचे आहे, ते घेतल्यामुळे तापमानातील बदलामुळे नेमके काय परिणाम होतात ह्याचे नेमके विश्लेषण विद्यार्थी करू शकतात व त्याचा दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करू शकतात ह्याची माहिती त्यांनी दिली
मातृभाषेतून शिक्षण किती महत्त्वाचे आहे आणि आयुष्यभर शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. प्रशालेचे माजी विद्यार्थी विश्वास काळे यांनी अनुभवातून शिकले पाहिजे असे सांगत . विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे प्रश्न विचारून डॉक्टर मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी विलास रबडे सरांच्या संकल्पनेतून साकारलेले हे हवामान केंद्र याला आज मूर्त रूप आले. विद्यार्थ्यांना स्वानुभव आणि प्रशिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी विविध उपक्रम शाळेत राबवत असतात त्याविषयी माहिती त्यांनी दिली.
गोंधळेकर सरांनी शिकावे नेटके असे सांगत सायकलच्या मागे असलेले विज्ञान सर्वांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी चाललेली धडपड याविषयी आपले विचार व्यक्त केले.
अतुल कुलकर्णी यांनी दृकश्राव्य माध्यमातून क्यू आर कोड विद्यार्थ्यांनी आता काळाची गरज ओळखून हवामान साक्षर विद्यार्थी बनले पाहिजे हे मत व्यक्त केले.
प्रशालेचे महा मात्र श्री. सुधीरजी गाडे सरांनी आता सौ. विमलाबाई गरवारे प्रशालाचे विद्यार्थी पाऊस कधी, केव्हा पडणार आहे हे स्वतः ओळखू शकतात असे सांगत तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा उल्लेख केला व तज्ञ व्यक्तींकडून अनुभवाचा साठा आपल्या निरीक्षणातून आपल्याकडे घेण्याचा ध्यास मनी बाळगा असे सांगितले हे सर्व लोक सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून शाळेसाठी जे जे काही करतात त्यांच्याप्रती कृतज्ञताभाव व्यक्त केला
या कार्यक्रमाला हवामान क्षेत्रातील आघाडीचे संशोधक डॉ. मिलिंद मुजुमदार, विज्ञान भारतीचे सक्रिय कार्यकर्ते श्री. विलास रबडे सर, प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री .विश्वास काळे सर, विज्ञान भारती चे श्री. भालचंद्र गोंधळेकर सर ,श्रीकांत कुलकर्णी सर आणि 1965च्या बॅचचे, माजी विद्यार्थी ,श्री एम .एस वर्तक सर, हवामान केंद्राचे निर्माते अतुल कुलकर्णी सर , शाळा समितीच्या अध्यक्षा आनंदी ताई पाटील मॅडम, (मएसाे)सहसचिव व प्रशालेचे महामात्र श्री. सुधीरजी गाडे सर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता नाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री .संजय जाधव सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.