म. ए. सो . सौ. विमलाबाई गरवारे पालखी सोहळा . प्रशालेचे मस्त,गोड छोटे वारकरी पालखी घेऊन गरवारे मेट्रो स्टेशनवर आणि तिथे हा भव्य दिव्य पालखी सोहळा रंगला . फूगडी काय . गोल फेर काय या सोबत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडूरंगा विठ्ठलाचा गजर ,ग्यानबा तुकाराम ,माऊली माऊली या गजराने अख्ख मेट्रो स्टेशन दणादूण गेले. सर्व मेट्रो प्रवासी व इतर सगळे प्रेक्षक फोटो आणि शुटिंग करण्यात अगदी रंगून गेले होते. आमच्या बाल वारकर्यांनी तर पालखीचा मनमुराद आनंद घेतला . आणि प्रचंड उत्साहात आम्ही गरवारे ते वनाज आणि वनाज ते गरवारे हा प्रवास अतिशय आनंदी पालखीमय वातावरणात पार केला .आमचे छोटे विठ्ठल रखुमाई तर अगदी गोड दिसत होते. प्रत्यक्ष विठू माऊलीच शाळेत आले आहेत हा सोहळा बघायला असे वाटत आहे.