म.ए.सो. चे सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पुणे – ४
*सहआयोजक:* दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर – संस्कृति मंत्रालय, भारत सरकार
“कला को जानो” मालिके अंतर्गत – सृजन झाबुआ बाहुली व चेरियल मुखवटा निर्मिती कार्यशाळा
*दिनांक: 15 ते 20 सप्टेंबर 2025
संस्कृति मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने “कला को जानो” या मालिकेअंतर्गत विविध पारंपरिक कला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून *झाबुआ बाहुली व चेरियल मुखवटा निर्मिती कार्यशाळा* आयोजित करण्यात आली.
*कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे
विद्यार्थ्यांना भारतातील लोककला, हस्तकला आणि परंपरागत शिल्पकलेचे ज्ञान देणे.
* कला आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देणे.
* पारंपरिक कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे.
* विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास व टीमवर्कची जाणीव निर्माण करणे.
कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
1. *झाबुआ बाहुली निर्मिती (मध्यप्रदेशातील आदिवासी कला):*
कलाकारांनी आपल्या कलेचा इतिहास, महत्त्व व जतनाची गरज यावर संवाद साधला.
संस्थेचे आजीव सदस्य व क्रीडावर्धिनीचे समन्वयक अध्यक्ष श्री विजय भालेराव सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व या कला यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहो असे आश्वासन कलाकारांना दिले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे
श्री .दीपक कुलकर्णी असिस्टंट डायरेक्टर साऊथ सेंटर कल्चरल सेंटर नागपूर ,सांस्कृतिक प्रशासन भारत सरकार सांस्कृतिक प्रशासन भारत सरकार
म. ए. सो. नियामक मंडळ सदस्य व श्री विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री .अतुल कुलकर्णी सर , प्रशालेचे महामात्र डॉ .निर्भय पिंपळे सर ,
बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमचे महामात्र डॉ.नेहा देशपांडे मॅडम बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ आदिती कुलकर्णी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ , उपमुख्याध्यापिका सुनीता गायकवाड मॅडम , कार्यशाळेच्या समन्वय
मा.प्रगती महाजनवार तेलंगणा व मध्य प्रदेशातून आलेले कलाकार उपस्थित सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
